breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा तिसर्या टप्प्यात?, सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा तिसर्या टप्प्यात. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आल्याने कोल्हापूर जिल्हा आता तिसर्या टप्प्यात आला आहे.त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील जीवनावश्यक सेवेच्या दुकानांबरोबरच अन्य सर्व दुकानेही सुरू करण्यास परवानगी देऊ, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे सोमवारपासून सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनप्रमुख जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत रात्री उशिरापर्यंत आदेश काढले नव्हते. शनिवारी याबाबतचे आदेश काढले जाणार आहेत.