breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार’; डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी : भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर छगन भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी केला. आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले.

हेही वाचा – भोसरीत सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा!

त्यावरून डॉ. अमोल कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिरुर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज  भरायला आले नाहीत. महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मी काय सभा घेणार नसून फक्त रोड शो करून जाईल. यावरूनच स्पष्ट होत आहे की शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button