breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

महागाईचा भडका! पेट्रोल पुन्हा महागले

नवी दिल्ली – गुरुवारी इंधनाचे दर महागल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा इंधनाचे दर वाढले. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले, तर मुंबईतील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झाली. तसेच डिझेलच्या दरात आज काहीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे डिझेलचा भाव स्थिर आहे. दरम्यान, आता राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर मुंबईत एका लिटर पेट्रोलसाठी आता १०७.८३ रुपये मोजावे लागत आहेत.

जुलै महिन्यात आतापर्यंत नऊ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. यापूर्वी मे महिन्यात १६ वेळा पेट्रोलचे दर वाढले. तर ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल ४१ वेळा आणि डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. या आठवड्यात गुरुवारच्या आधी तीन दिवस देशात इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा दरवाढ करण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button