breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दहावीचा निकाल आज

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

दुपारी 1 वाजेपासून ऑनलाइन मिळणार गुणपत्रिका

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-2018 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी (दि. 8) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

गेल्या दिवसांपासून दहावी निकालाबाबत सोशल मीडियावर विविध तारखा “व्हायरल’ होत होत्या. अखेर मंडळाने शुक्रवारी निकाल घोषित करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. परीक्षार्थी सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल. तसेच हा निकाल “एसएमएस’ सेवेद्वारे मोबाइलवरही उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

मोबाइलवरही पाहता येणार निकाल
मोबाइल “एसएमएस’ सेवेद्वारेही निकाल पाहता येईल. BSNL मोबाइल क्रमांकावरून 57766 या क्रमांकावर MHSSC and send to short code 57766 अशा पद्धतीने मेसेज पाठवून निकाल जाणून घेता येणार आहे.

ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतिसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी आवश्‍यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावरील अर्जाची प्रत काढून ते भरता येणार आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित (सेल्फ ऍटेस्टेड) प्रतिसह दि. 9 ते 18 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायाप्रतिसाठी शनिवार दि. 9 ते दि. 28 जूनपर्यंत शुल्क जमा करून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे. ती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून पुढील पाच दिवसांत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2018 व मार्च 2019 मध्ये होणाऱ्या परीक्षा अशा दोन संधी उपलब्ध राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button