‘मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींचा लढा प्रेरणादायी’; शेखर काटे
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी : मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या लढ्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा होती. निजामाच्या अन्यायी जुलमी सत्तेविरूद्ध जनतेने दिलेले हा लोकलढा होता. या लढ्यात विविध जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) शेखर काटे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात व्याख्याते नितीन चिलवंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याचे यथोचित वर्णन केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात शेखर काटे बोलत होते.
हेही वाचा – ‘भारताच्या नादी लागाल तर तुमची मुलं अनाथ होतील’; केंद्रीय मंत्र्याचा पाकिस्तानला इशारा
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, ऍड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, रविंद्र सोनवणे, रजनी गोसावी, मनीषा गटकळ आदीसह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काटे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा अतिशय ज्वलंत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इतका मराठवाडा मुक्तिसंग्राम ही महत्वपूर्ण आहे. मुक्तिसंग्राम यामुळे हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्याने भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व मिळाले, असे प्रतिपादन शेखर काटे यांनी केले.