तुम्हाला वाहतुकीच्या दंडापासून वाचण्यास मदत करतील ‘हे’ दोन अॅप्स

सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. मात्र, जर तुम्हाला वाहतुकीच्या दंडापासून वाचायचं असेल तर ह्या दोन अॅप्सचा नक्की वापर करा.
Waze : हे एक अॅप आहे, जे मॅप आणि स्पीड कॅमेरा दोन्ही शोधू शकते. स्पीड कॅमेरा येण्यापूर्वीच ते तुम्हाला एक सूचना पाठवते, कॅमेरा येणार असल्याची सूचना देते. अॅप बनवणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, कॅमेऱ्याशिवाय हे अॅप बंद रस्ते, मोकळे रस्ते आणि रहदारी असलेल्या रस्त्यांची माहितीही देऊ शकते.
हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांवर वापरता येते. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर ४.४ रेटिंग मिळाले आहे. याशिवाय १० कोटींहून अधिक युजर्सनी ते आतापर्यंत डाउनलोड केले आहे.
हेही वाचा – ‘भारताच्या नादी लागाल तर तुमची मुलं अनाथ होतील’; केंद्रीय मंत्र्याचा पाकिस्तानला इशारा
Radarbot : हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही उपकरणांवरही चालवता येते. वर नमूद केलेल्या अॅप्सप्रमाणे, हे अॅप देखील स्पीड कॅमेरा नेव्हिगेट करते आणि तुम्हाला आगाऊ सूचना पाठवते. Wave अॅप आणि हे अॅप दोन्ही GPS वर चालतात आणि स्पीड कॅमेरे ट्रॅक करतात आणि ते येण्यापूर्वीच सूचना पाठवतात.
हे अॅप तुम्हाला रस्त्यावरील सरासरी वेगाचीही माहिती देऊ शकते. या अॅपला Google Play Store वर ४.१ रेटिंग मिळाले आहे, याशिवाय, ५ कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी ते आतापर्यंत डाउनलोड केले आहे.