ताज्या घडामोडीराष्ट्रिय

घडामोडींना वेग इम्रान खान यांचे सरकार कोसळताच निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी

इस्लामाबाद|इम्रान खानयांचे सरकार कोसळताच पाकिस्तानात घडामोडींना वेग आला आहे. इम्रान खान यांच्या पराभवाची नामुष्की कोसळताच त्यांच्या निकटवर्तीयांनाही मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांचे निकटवर्तीय आता रडारवर आले आहे. इम्रान खान यांचे प्रवक्ता डॉ. अर्सलान खालिद यांच्या घरी धाड पडली आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने ट्विटकरत याबाबत माहिती दिली आहे.

पीटीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या संदर्भात माहिती दिली आहे. इम्रान खान यांचे माजी प्रवक्ता डॉ. अर्सलान खालिद यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. त्यांचे सर्व फोन हिसकावून घेण्यात आले आहेत. त्यांनी कधीच सोशल मीडियावरही कोणाबाबत अपशब्द वापरले नाहीत ना कधी कोणत्या संस्थानावर टीका केली आहे. एफआयएने हे लक्षात घेतलं पाहिजे. खालिद यांच्यावर कोणत्या आरोपांतर्गंत ही कारवाई करण्यात आली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

शनिवारी रात्री पीटीआय सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांना बर्खास्त केलं आहे. मात्र, अद्याप इम्रान खान यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या सदस्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला. पुढचं कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवलं. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर १७४ सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला व ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने हा ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button