डॉ. डी. वाय. पाटील वराळे कॅम्पसच्या विद्यार्थ्यांकडून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लॅशमॉबचा धमाका

पुणे : डॉ. सुशांत पाटील ग्रुपच्या डॉ. डी. वाय. पाटील वराळे कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध मोक्याच्या ठिकाणी उत्स्फूर्त ‘फ्लॅशमॉब’ सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कला, संस्कृती आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध ठिकाणी रंगला नृत्याचा आविष्कार
दसरा चौक (बाणेर), बालेवाडी हायस्ट्रीट, ग्रँड हायस्ट्रीट मॉल (हिंजवडी), संत ज्ञानेश्वर चौक (निगडी), दगडूशेठ हलवाई गणपती जवळील मंडई मेट्रो स्टेशन आणि निगडीतील भक्ती-शक्ती चौक या गजबजलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दमदार नृत्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या ऊर्जावान परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि संघभावना
उत्कृष्ट समन्वय, जबरदस्त आत्मविश्वास आणि जोशपूर्ण नृत्यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या उपक्रमातून संस्थेतील समृद्ध सांस्कृतिक वातावरण आणि विद्यार्थ्यांमधील एकीचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करणे, हा यामागील मुख्य उद्देश होता.
हेही वाचा – ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा’; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

मार्गदर्शन आणि सहकार्य
हा उपक्रम डॉ. सुशांत पाटील आणि ॲड. अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठिंब्यामुळे यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संचालक व प्राचार्य डॉ. सुरेश माळी, डॉ. मेघना भिलारे, डॉ. सुरेश शिरभाडुर्कर आणि डॉ. आर. टी. गोलगिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यशस्वी आयोजनात ‘यांचा’ पुढाकार
कार्यक्रमाच्या यशात क्रिएटिव्ह आणि कल्चरल डायरेक्टर श्रेयस देशपांडे यांच्यासह उन्मेष कोर्डे, मंगेश ढोले, तनय मत्तलवार, हेमंत पानसरे, जयेश, जय आणि राजू पासलकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फ्लॅशमॉबमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेमार्फत विशेष कौतुक करण्यात आले आहे.




