Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा’; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीला बळकटी देणारा ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रस्तावित ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’च्या भूमिपूजन समारंभाला त्या उपस्थित होत्या. यावेळी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या क्रीडा विज्ञान उपकरणांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी आयसीआयसीआय बँकेचे झोनल हेड अभिजीत सिंग पवार, मासिया (MASSIA) अध्यक्ष अर्जुन गायकवाड, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील खेळाडूंच्या प्रतिभा विकासासोबतच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. सीएसआर भागीदारीमुळे आधुनिक प्रशिक्षण, वैज्ञानिक सुविधा व उच्च कार्यक्षमतेची साधने उपलब्ध होत असून, त्यामुळे खेळाडूंच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या तयारीला मोठी चालना मिळत आहे.

हेही वाचा –  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजन

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्यातील सहकार्यामुळे शासकीय योजना व कॉर्पोरेट सहभाग यांचा प्रभावी समन्वय साधला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या भागीदारीमुळे उच्च कार्यक्षमतेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना बळ मिळून मराठवाड्यातील युवा खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘खेलो इंडिया’ अभियानांतर्गत पायाभूत सुविधा विकास, प्रतिभा शोध, तसेच वैज्ञानिक प्रशिक्षण प्रणालीवर विशेष भर देण्यात येत असून, भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे., असेही राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या.

यावेळी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे यांनी साई सेंटरच्या माध्यमातून विविध क्रिडा स्पर्धेतील यशाबाबत, मल्टीपर्पज हॉलबाबत माहिती दिली.

आयसीआयसीआय बँकेचे झोनल हेड अभिजीत सिंग पवार यांनी क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी आपला सहभाग कायम असेल, असे सांगून आपल्या क्रीडा क्षेत्रातील आपल्या सहभाबाबत माहिती दिली.

यावेळी विविध क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंचा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button