Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वारगेट प्रकरणानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे; घेतला मोठा निर्णय, ‘त्या’ 72 बसेस मोडीत काढणार

पुणे :  २५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकातील बंद असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळून आली होती. स्वारगेट बसस्थानकातील घटनेच्या दिवशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे निंलबन करण्यात आले होते. यामुळे स्वारगेट स्थानकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणानंतर एसटी महामंडळाला खडबडून जाग आली असून मुदत संपलेल्या आणि नाददुरस्त अशा बसेस मोडीत काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्यात येणार आहे.

येत्या 21 मार्च रोजी या 72 बसेसचा भंगारात लिलाव करण्यात येणार आहे. याची अंदाजित रक्कम 2.50 ते 3 कोटी रुपये मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून या एसटी बसेस अडगळीत पडल्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. तसेच बसमधील साहित्याच्या चोरीच्या घटना घडत आहेत. २५ फेब्रुवारीला स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

हेही वाचा –  थकबाकी वसूलीसाठी महिला पथकांची नेमणूक

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीतील १०० बसथांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाटयाजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात. हे प्रवासी रात्री अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी मोठ्या संख्येने परगावाहून अनेकजण येत असतात. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करत असतात. त्यानुसार आता महामार्गांवरील थांब्यांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button