ताज्या घडामोडीमुंबई

मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील वळण मार्गावर पुन्हा अपघात

रेल्वेने हलगर्जीची परिसीमा गाठली

मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात लोकलमधून लटकणारे १३ प्रवासी कोसळून त्यातील चौघाचा त्याच जागी तर एकाचा रुग्णालयात अपघात मृत्यू झाला होता. सोमवार ९ जून २०२५ रोजी ही घटना घडली होती. या घटनेला महिना होत नाही तोच येथे पुन्हा अपघात घडला आहे. या मार्गावर ४० ते ४५ वयाच्या इसमाला लोकलची ठोकर लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.या घटनेनंतर रेल्वेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील वळण मार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. शनिवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलने एका इसमाला उडवल्याने त्याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगकरत असताना हा अपघात घडला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिकचा तपास मुंब्रा ठाणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

हेही वाचा – टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”

40 ते 45 वर्षीय अज्ञात पुरुष रेल्वे ट्रॅकवर क्रॉस करत असताना कल्याण दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचा फटका या इसमाला बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सायंकाळी ही घटना घडल्यानंतर या जखमी इसमाला पोलिसांनी सुरुवातीला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे व्यवस्थित उपचार न मिळाल्याने या इसमाला नंतर जे जे रुग्णालय मुंबई येथे हलवण्यात येणार असल्याचे समजते. या घटनेनंतर पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अनेक स्थानकांवर एम्ब्युलन्स नाही
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवार दि.९ जून २०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजता दोन उपनगरीय लोकल एकमेकांजवळून वेगाने जात असताना प्रवासी ८ प्रवासी खाली कोसळल्याची भयंकर दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातात ४ प्रवाशांच्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.तर एका प्रवाशाचा रुग्णालयात काही दिवसांनी मृत्यू झाला होता. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रथमोपचार म्हणून वैद्यकीय कक्ष आणि एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही अनेक स्थानकांवर ही सेवा उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button