‘गुरु हेच जीवनाचे दीपस्तंभ’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : आपल्या सर्वांच्याच आयुष्यात गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरू हेच आपल्या समाजातील खरे दीपस्तंभ असतात. समाजातील अशा गुरूंचा गौरव करणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आप्पा रेणुसे, विजय जगताप, अंकुश काकडे, दीपक मानकर, दत्ता धनकवडे, रमेश कोंडे, जालिंदर कामठे, भालचंद्र जगताप, अभय मांढरे उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांना गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पवार आणि मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, मोत्याची माळ, पुस्तके आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा – सावधान! राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज, 9 जुलैपर्यंत IMDचे तीव्र इशारे
यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या आलोक मनोज तोडकर या युवा खेळाडूला पवार यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सोहळ्याचे हे विसावे वर्ष होते. यावेळी गुरुवंदना या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी फिरोदिया, कुवळेकर आणि भाटे यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. तर, युवराज रेणुसे यांनी आभार मानले.