Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलं 608 धावांचं आव्हान, गोलंदाजांची कसोटी

IND vs ENG, 2nd Test : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयाची संधी आहे. फक्त आता गोलंदाजांना चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. खरं तर पाटा विकेटमुळे गोलंदाजांचा आधीच घाम निघाला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना झटपट विकेट काढणं कठीण जाणार आहे. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 407 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. या धावांचा पाठलाग करताना भारताने 6 गडी गमवून 427 धावा केल्या. यानंतर शुबमन गिलने डाव घोषित केला. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. गोलंदाजांची जादू चालली तर भारत सहज हा सामना जिंकू शकते. अजूनही शेवटचा दिवसाचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे आता गोलंदाजीसोबत भारतीय खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण करणं भाग आहे.

दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर करुण नायर 26 धावा करून तंबूत परतला. केएल राहुलने 84 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल 162 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार मारत 161 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 99.38 चा होता. ऋषभ पंतने 58 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारत 65 धावा केल्या. पण नितीश कुमार रेड्डी पहिल्या डावासारखात दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाला.

हेही वाचा – ‘गुरु हेच जीवनाचे दीपस्तंभ’; उपमुख्यमंत्री अजित पवार

दोन वर्षांपूर्वी एजबॅस्टन येथे आतापर्यंतचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला होता. तेव्हा इंग्लंडने 3 गडी गमवून 378 धावा केल्या होत्या. इंग्लंडने भारताविरुद्ध अवघ्या दोन वर्षांपूर्वी हे लक्ष्य गाठलं होतं. हा निकाल अजूनही भारतीयांच्या जिव्हारी लागलेला आहे. 2021 च्या मालिकेतील पाचव्या सामन्यात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी नाबाद शतके ठोकली आणि इंग्लंडने एकूण धावसंख्या गाठली. कसोटी क्रिकेट इतिहासातील त्यांचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग ठरला होता. आता 608 धावांचं लक्ष्य आहे. यापूर्वी 2009 मध्ये वेलिंग्टन येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या डावात 616 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button