IPL २०२५ साठी १० संघांचे कर्णधार ठरले, कोण कोणत्या संघाचे करणार नेतृत्व?

IPL 2025 | इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा बिगुल वाजला असून आयपीएलमधील सर्व १० संघांनी सराव करण्यास देखील सुरुवात केली आहे. या नव्या हंगामात आयपीएलमध्ये ५ नव्या दमाचे युवा कर्णधार नेतृत्व करताना दिसणार आहेत. कोण कोणत्या संघाचे नेतृत्व करणार? जाणून घेऊया..
आयपीएलमधी १० संघांच्या कर्णधारांची यादी
१ – दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल
२ – सनराइजर्स हैद्राबाद- पैट कमिंस
३ – रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु- रजत पाटीदार
४ – राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
५ – पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर
६ – लखनौ सुपर जायंट्स- ऋषभ पंत
७ – मुंबई इंडियन्स- हार्दिक पंड्या
८ – कोलकाता नाइट राइडर्स- अजिंक्य रहाणे
९ – गुजरात टायटन्स- शुभमन गिल
१० – चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड
हेही वाचा : देहूनगरीत आज रंगणार बीज सोहळा! उपमुख्यमंत्र्यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्काराने गौरव
आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट राइडर्स नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलचे सर्व सामने एकूण १३ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.