Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदान केंद्रांची ठिकाणे बदलली

पुणे :  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून, ही मतदान केंद्रे गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

हेही वाचा     –      ‘महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे’; शरद पवार

या बदलानुसार मोलेदिना टेक्निकल ज्युनिअर कॉलेज, शंकरशेठ रोड, इलेक्ट्रीकल विभाग, खोली क्रमांक १ येथील मतदान केंद्र क्रमांक २२६ मीरा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, शंकरशेठ रोड, सेव्हन लव्हज चौक येथे, मोलेदिना टेक्निकल ज्युनिअर कॉलेज, शंकरशेठ रोड, इलेक्ट्रीकल विभाग, खोली क्रमांक २ येथील मतदान केंद्र क्रमांक २२७ आनंद पार्क को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. प्लॉट क्रमांक ३९०-२,३,४ शंकरशेठ रोड याठिकाणी, नूतन प्राथमिक विद्यालय, टेनरी कॅम्प, नेताजी नगरजवळ, वानवडी, खोली क्रमांक १ व २ येथील मतदान केंद्र क्रमांक २४५ व २४६ नेताजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. नेताजीनगर, वानवडी येथे, तसेच क्रूट मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, वानवडी, तळमजला, खोली क्रमांक ९ येथील मतदान केंद्र क्रमांक २७३ रहेजा गार्डन फेडरेशन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, केदारी पेट्रोल पंप समोर, वानवडी येथे असणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button