Breaking-newsमुंबई
सेरो सर्व्हे सकारात्मक आल्याने मुंबई पालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – मुंबई महापालिकेने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक हॉटेल, लॉज आणि सभागृहे क्वारंटाईन प्रक्रियेसाठी ताब्यात घेतली होती. पण आता सेरो सर्व्हे सकारात्मक आल्याने यातील ७० टक्के हॉटेल, लॉज पालिकेने परत केली आहेत.
महापालिकेने विविध भागांतील सुमारे ३४८ हॉटेल, लॉज व सभागृहे क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतली होती. मात्र अलीकडेच मुंबईतील तीन वॉर्डात सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याचे दिसून आले आहे. या सकारात्मक अहवालामुळे पालिका प्रशासनाने क्वारंटाईनसाठी घेतलेली ७० टक्के हॉटेल, लॉज संबंधित मालकांना परत केली. त्यामुळे आता फक्त १४८ क्वारंटाईन सेंटर मुंबईत सुरू आहेत. सेरो सर्व्हेमध्ये ५७टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले आहे. ही सकारात्मक बाब असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.





