‘महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे’; शरद पवार

Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत निवडून आल्यानंतर पाच मोठी आश्वासनं काय असतील ते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शरद पवार यांच्या आज नागपूरमध्ये तीन सभा होणार आहेत. यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला परिवर्तन हवं असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आमचा प्रचार सुरू झाला आहे. राहुल गाधी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मीदेखील त्या सभेला उपस्थित होतो. प्रचाराची सुरूवात आम्ही केली आहे. मी आता नागपूरला आहे. नागपूरमध्ये तीन सभा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. आजपासून राज्यांमध्ये दौऱ्यांवर निघाले आहेत.
हेही वाचा – सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवार भडकले; म्हणाले..
महाविकास आघाडीच्या पाच घोषणा :
१) महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार
२) शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार
३) जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.
४) २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार.
५) बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार.





