ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

लोणावळ्यात भाजपाचे प्रशिक्षण महाअभियान; पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा

पिंपरी | भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा भव्य प्रशिक्षण वर्ग नुकताच लोणावळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा करण्यात आली.

दोन दिवस चाललेल्या या महाअभियामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख व महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी सहभागी होत एकूण १२ विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या निवासी जिल्हा प्रशिक्षण वर्गाला १५० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन

पिंपरी चिंचवड जिल्हा प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थींना पक्षाची स्थापने पासून ची सर्व माहिती असणारी भव्य प्रदर्शनी कार्यरक्रम स्थळी उभारण्यात आली होती या भव्य प्रदर्शनीचे व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी व पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘शतप्रतिशत भाजपा’ हा विचार आता प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ घराघरापर्यंत नेण्याचे आवाहन केले. देशात अडीच हजारांहून अधिक राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या भाजपाचा सुवर्णकाळ सुरू असल्याचे नमूद करत कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना ‘हवेहवेसे’ वाटतील असे काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या कोणत्याही वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची प्रत्येकाने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पक्षात काम करताना मान-पान आणि प्रतिष्ठा आपापसात ठेवावी, परंतु मिळालेल्या प्रत्येक मानाचा सन्मान करणे देखील तितकेच आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडच्या गल्लीगल्लीत भाजपा दिसला पाहिजे आणि संघटनेच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने पक्ष शिस्त आपल्या आचरणात आणली पाहिजे. पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा प्रभारी ॲड. भरत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, या जिल्हा प्रशिक्षण महाअभियानाचे प्रमुख व संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अभियान सहप्रमुख मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, पक्षाचे नगरसेवक राहुल कलाटे, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण भारतीय आघाडीचे माजी अध्यक्ष राजेश पिल्ले, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडे आदी प्रमुख जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व अपेक्षित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवस पहिला

उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवर सक्षम करण्यासाठी विविध सात सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत झालेल्या पहिल्या सत्रात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी ’व्यावहारिक सत्र’ घेत कामकाजाचे महत्त्व विषद केले.

दुपारी दुसऱ्या सत्रात १२:०० ते ०१:०० या वेळेत प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांनी पक्षाच्या ’वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

दुपारी ०१:०० ते ०२:०० या वेळेत सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

दुपारच्या तिसऱ्या सत्रात ०२:०० ते ०३:०० या वेळेत विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी ‘कार्य विस्तार’ या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

हेही वाचा

“विजय यांचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही”; DMK नेत्याचा मोठा दावा

त्यानंतर दुपारी चौथे सत्र ०३:०० ते ०४:०० या वेळेत प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये यांनी आधुनिक ’मीडिया व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

दुपारी पाचवे सत्र ०४:०० ते ०५:०० या वेळेत ठाणे विधानसभेचे आमदार संजयजी केळकर यांनी भाजपाची ‘कार्य पद्धती’ या विषयावर सखोल प्रकाश टाकला.

संध्याकाळी ०५:०० वाजता चहापानाची विश्रांती झाली.

सहाव्या सत्रात संध्याकाळी ०५:३० ते ०६:३० या वेळेत विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी ‘देशासमोरली आव्हाने’ या अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सायंकाळी ०६.३० ते ०७.३० या वेळेत झालेल्या सातव्या सत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेशजी खणकर यांनी ‘कार्यकर्ता विकास संगोपन आणि जबाबदारीची जाणीव’ या विषयावर प्रभावी मांडणी केली.

दिवस दुसरा

प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवसाची सकाळी ०६ वाजता सुरुवात ’योगा व व्यायाम’ सत्राने झाली, ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी उत्साहाने भाग घेतला. हे सत्र माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी घेतले.

त्यानंतर सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत आठव्या सत्रात सत्रात पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय संवादक योगेशजी बाचल यांनी ‘बूथ व्यवस्थापन, ६ स्थायी कार्यक्रम, मन की बात आणि SIR’ या संघटनात्मक विषयांवर महत्त्वपूर्ण धडे दिले.

सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत नवव्या सत्रात विधान परिषदेचे आमदार सुनीलजी कर्जतकर यांनी ‘भाजपा इतिहास’ या विषयावर सविस्तर मांडणी करत पक्षाच्या प्रवासाची माहिती दिली.

दुपारी १२:०० ते ०१:०० या वेळेत झालेल्या दहाव्या सत्रात पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘अंत्योदयातील संतृप्तता, मोदी सरकारच्या गरिबांसाठीच्या योजना व सरकारची कामगिरी या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

दुपारी ०१:३० ते ०२:३० या वेळेत अकराव्या सत्रात प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ‘सोशल मीडिया, AI, नमो app, saral app’ या आधुनिक तंत्रज्ञान विषयक सत्रात कार्यकर्त्यांना डिजिटल युगात कसे काम करावे, याचे तंत्र शिकवले.

दुपारी ०२:३० ते ०३:०० या वेळेत झालेल्या बाराव्या आणि अंतिम सत्रात *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड महानगरचे जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे यांनी ‘विचार परिवार’ या विषयावर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा दिली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे पिंपरी चिंचवड जिल्हा प्रमुख व संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. यावेळी त्यांना मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे, सचिन राऊत यांनी सहाय्य केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानाला पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रशिक्षण वर्गांमुळे कार्यकर्त्यांना वैचारिक बळ मिळत असून संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान होत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सेवा, विकास आणि राष्ट्रहिताचा विचार पोहोचविण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सर्व नेत्यांनी आणि आयोजकांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button