Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राजकीय मैदानावर धडाडणार तोफा; प्रचारासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या दिग्गजांची हजेरी

पुणे :  विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपली ताकद पणाला लावण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता पुढील दोन ते दिवसांपासून केंद्रातील, तसेच राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा पुण्यात होणार आहेत.

यात महायुतीकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी सभा घेणार असून, महाविकास आघाडीकडून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांंच्या सभांचे नियोजन सुरू आहे. या सर्व सभा पुण्यात करण्याचे नियोजन असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे, तर या सभांमध्येच सर्व पक्षांचे जाहीरनामे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात कॅन्टोन्मेंट मतदारसंघात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे, त्यांचा अद्याप मतदारसंघ निश्‍चित झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात समारोपाची सभा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा    –      ..तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही; राज ठाकरेंचं वक्तव्य 

शहरातील व्यापारी वर्ग, गुजराती, मारवाडी मतदारांमध्ये प्रचार करण्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य नेते पुण्यात येणार आहेत, तर अजित पवार यांची वडगाव शेरी, हडपसर येथे सभा होण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघात भरत गोगावले यांची सभा होणार आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सचिन, पायलट आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते पुण्याच्या मैदानात उतरविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहेत.

त्यासाठी महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच सचिन पायलट, पी. चिदंबरम्‌, ॲड. मनु संघवी, चेन्नीथला यांच्यासह प्रदेश पातळीवरील नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याही सभांचे नियोजन सध्या सुरू आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button