Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी स्वीडनच्या रॉयल ​​ऑर्डर ऑफ पोलर स्टार या स्वीडनकडून एखाद्या राष्ट्रप्रमुखाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार आहे.

स्वीडनकडून हा पुरस्कार एखाद्या राष्ट्र प्रमुखांना दिला जात असतो. रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार पुरस्काराची सुरुवात १७४८ मध्ये करण्यात आली आणि स्वीडनसाठी किंवा स्वीडिश हितासाठी, विशेषतः सार्वजनिक उपक्रमांमधील वैयक्तिक प्रयत्नांना, तसेच सार्वजनिक कार्ये आणि कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सन्मानित करणे हा याचा उद्देश आहे.

‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ हा स्वीडन सरकारकडून परदेशी नागरिक आणि जागतिक नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्कारातील ‘कमांडर ग्रँड क्रॉस’ ही सर्वात उच्च श्रेणी मानली जाते. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, जागतिक शांतता आणि दोन देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांनाच या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

हेही वाचा –  संयुक्त जमिनीच्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय; आता संमतीपत्रासह सौर पंपाची वीज जोडणी मिळणार…

रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टारची स्थापना १७४८ मध्ये करण्यात आली आणि स्वीडनसाठी किंवा स्वीडिश हितासाठी, विशेषतः सार्वजनिक उपक्रमांमधील वैयक्तिक प्रयत्नांना, तसेच सार्वजनिक कार्ये आणि कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मान्यता देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

“पंतप्रधान मोदींना मिळालेला हा सन्मान म्हणजे भारत आणि स्वीडन यांच्यातील धोरणात्मक भागीदारीतील एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. जागतिक शांतता, समृद्धी आणि दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य पुढे नेण्याच्या समान वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button