उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘त्यांच्या’ नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजप पक्ष संपत चाललाय : आमदार सुनील शेळके
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालय, तिसरा मजला, येरवडा येथील निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ७ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय सचिन बारवकर यांनी दिली आहे.





