ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘नाईक कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर’; पीरपारसनाथ महाराज

शिराळा : प्रतिनिधी

शिराळा येथील नाईक कुटुंब विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिला असे गौरवोद्गार गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पीर पासरनाथ महाराज यांनी केले.

शिराळा गोरक्षनाथ मंदिर ते पंढरपूर जाणारी गोरक्षनाथ पायी रथ दिंडी सोहळ्यास प.पु. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक (नाना), स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक(दादा ) व संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते पृथ्वीसिंग नाईक (बाबा) यांनी पालखी रथास कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था करण्यासाठी जनरेटर भेट दिला. त्यावेळी पीर पारसनाथ महाराज बोलत होते.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी भाजपातर्फे ‘‘एकत्रित योगा’’

जनरेटर मुळे दिंडीस जाणाऱ्या वारकरी लोकांना त्याचा चांगलाच फायदा होणार असे मत अवघड पीर आनंदनाथजी महाराज यांनी केले आणि नाईक कुटुंबाचे आभार मानले.

यावेळी मरळनाथपूरचे सरपंच धनाजी मोरे, उपप्राचार्य बी.आर.दशवंत, प्रा.राजसिंह पाटील, जगन्नाथ बाऊचकर, सचिन शेठे, संतोष हिरुगडे, अवधूत गायकवाड, रणजित यादव, महेश शिंदे, प्रसाद गिरी, राज पाटील, प्रवीण गायकवाड, रोहित गायकवाड, विक्रम यादव, विश्वजित गायकवाड, प्रा.देशमुख, प्रा.हिवराळे, डॉ.जाधव, डॉ.घारे परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button