breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीचा राजीनामा घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महापौर माई ढोरे यांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. स्थायी समितीमध्ये “एसीबी”ची धाड पडली. त्यामध्ये सभापतींना अटक करण्यात आली. शहराला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे स्थायी समितीमधील सर्वांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.

यावेळी स्थायी समितीच्या सदस्या सुलक्षणा शिलवंत- धर, पौर्णिमा सोनावणे, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर, संतोष वाघेरे, प्रसाद कोलते, चेतन फेंगसे, अक्षय माछरे, प्रतीक साळुंखे, अफ्रिद शिकलगार आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांना व स्थायी समिती कार्यालयातील चार कर्मचा-यांना मागील महिण्यात एससीबीने भ्रष्टाचार करताना रंगेहाथ पकडून अटक केली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावलौकिकास धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. यामध्ये शहरातील सर्व घटकांचे योगदान आहे. मात्र गेल्या साडे चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड मनपाचे नाव भ्रष्टाचारातच गाजत आहे. या भ्रष्टाचारी पदाधिका-यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्याकडे केली. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी देखील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी कंपनी, टेक महिंद्रा कंपनी, एल ॲण्ड टी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, महिला प्रशिक्षण शिबीर, शिक्षण मंडळातील घोटाळा, स्थापस्थ, विद्युत विभागातील भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजत आहेत. माणूसकीला काळीमा फासणा-या काही घटना कोरोना कोविड काळात घडल्या आहेत. कोरोना कोविड काळात रुग्णांना देण्यात येणा-या सेवा, सुविधांमधिल भ्रष्टाचार त्यांच्या बिलांमधिल गैरव्यवहार अजूनही सुरु आहे. भाजपाच्या या भ्रष्टाचारी राजवटीमुळे शहरातील सुजाण नागरीकांची मान शरमेने खाली जात आहे.
महापालिकेच्या जेष्ठ सभासद या नात्याने संबंधित स्थायी समितीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button