breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी भाजपातर्फे ‘‘एकत्रित योगा’’

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

निगडी- प्राधिकरण अन्‌ भोसरी सी-सर्कल येथे होणार कार्यक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी- प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, माजी राज्यमंत्री सचीन पटवर्धन, प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

योग दिवस मावळ लोकसभा संयोजक राजू दुर्गे म्हणाले की, जगभरातील नागरिकांना योगाचे महत्त्व पटावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आणि तो जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला. आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. योगा हा अनेक शतकांपासून चालत आलेला पारंपरिक व्यायाम प्रकार आहे. योगामधील काही सहज प्रकार जे आपण अत्यंत सहजपणे करू शकता असे प्रकार आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे या कार्यक्रमातून आपल्याला समजणार आहेत. योग प्रकारांमुळे आपण आपले आयुष्य निरोगी आणि अत्यंत सहजपणे जगू शकतो.

हेही वाचा – हरदीप सिंह निज्जर कसा बनला प्लंबर ते खलिस्तान टायगर फोर्सचा नेता, जाणून घ्या..

कार्यक्रमाचे संयोजन राजू दुर्गे, शितल शिंदे, संदीप कस्पटे, रविंद्र माने, बाळासाहेब शेलार, मच्छिंद्र परंडवाल, रामविलास खंडेलवाल, अनंता कुडे, अविनाश बवरे यांनी केले आहे.

भोसरीमध्ये इंद्रायणीनगर येथे कार्यक्रम…

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदार संघांतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघातील इंद्रायणीनगर येथे सेक्टर ७ मधील सी- सर्कल येथे दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पतंजली शिक्षक सुनील हुले यांच्या सहकार्याने योगाचे प्रशिक्षण होणार आहे. संयोजनामध्ये माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार आघाडीचे हनुमंत लांडगे, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व नागरिकांनी येताना योगा मॅट घेऊन येणे आणि वेळेत उपस्थित राहावे, असे योग दिवस संयोजक गीता महेंद्रु यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button