breaking-newsपिंपरी / चिंचवड

या महिन्यात विद्युत प्रवाह खंडित करू नका – युवासेनेची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरेना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हूणन सरकारने जमावबंदी केली आहे. त्याच पाश्ववभूमीवर पिंपरी चिंचवडमधील बहुतेक उद्योग ठप्प झाले आहे.

फुगेवाडी -दापोडीत परिसरात मोलमजुरी करून कामविणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. कोरोना संसर्गमुळे नागरिक घरी बसून आहे. त्यामुळं ज्यांचे विदयुत बिल राहिले असेल किंवा ह्या महिन्यात राहतील अशा नागरिकांचा वीजपुरवठा ह्या महिन्यात खंडित करू नये. अशी मागणी विदयुत अधिकारी सोनवणे ह्यांना पिंपरी युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.

ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला संघाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची, अंकुश जाधव, शुभांगी गायकवाड ह्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button