breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या ‘पवनाथडी’ जत्रेच्या खर्चात ‘गोलमाल’, अंदाजित खर्चापेक्षा प्रत्यक्षातील खर्चात वाढ

पिंपरी |महाईन्यूज|

महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. मात्र, त्या पवनाथडी जत्रेच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. महिलांच्या उन्नतीपेक्षा ठराविक राजकीय नेत्यांचा अजेंठा राबवून पालिकेचे लाखो रुपयाची उधळपट्टी होवू लागले आहेत. त्यामुळे पवनाथडी जत्रेतील खर्चाच्या तफावतीमुळे नागरवस्तीत गोलमाल सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेने मार्च महिन्यात सांगवीच्या पीडब्लू मैदानावर आयोजित पवनाथडी जत्रेचा अंदाजित खर्च 40 लाख 50 हजार रुपये होता. परंतू, प्रत्यक्षात 97 लाख 36 हजार 746 रुपये खर्च झाला आहे. मात्र, कोरोना व लॉकडाउनमध्ये कमी मनुष्यबळ आणि वाढलेले काम यामुळे खर्चाबाबतचा हिशेब संबंधित विभागांकडून उशिरा प्राप्त झाला आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत चार ते आठ मार्च कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवना थडी यात्रा आयोजित केली होती. त्यात एक हजार 225 स्टॉल होते. करमणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले.

पहिल्या दोन दिवसांतच 36 लाखांची उलाढाल झाली होती. मंडप व्यवस्था, स्टॉल उभारणी, विद्युत व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुरक्षा व अग्निशामक विभागांकडून खर्च करण्यात आला. त्यातील 40 लाख 94 हजार 999 रुपये खर्चाची रक्कम संबंधित ठेकेदारांना देण्यात आली असून, आणखी 52 लाख 49 हजार 746 रुपये देणे बाकी आहेत. याबाबत विषय बुधवारच्या (दि.14) स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button