breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे ; असा त्रास देण्याचं, अटक करण्याचं काम…”

मुंबई  |

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, आज त्यांच्या शासकीय निवास्थानी पोलीसही दाखल झाले आहेत. यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. शिवाय, फडणवीसांना आलेल्या नोटीसावरून राज्य सरकारचा निषेधही नोंदवला आहे. फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपा नेते देखील उपस्थित आहेत. तर, दुपारी १२ वाजेपासून फडणवीसांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपावर टीका देखील केली आहे.

“प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे, असं दिसतय. असा त्रास देण्याचं अटक करण्याचं काम, ईडी, सीबीआय, आयकर विभाग याचा पुरेपूर उपयोग ते करतात. इथे मात्र साधं पोलीस चौकशीला देखील जायचं नाही आणि तिकडे मात्र वाटेल तसं कायदेशीर, बेकायदेशीर आरोप लावायचे, आतमध्ये टाकायचं आणि नंतर मग जा तुम्ही कोर्टात आणि या सुटून.” असं छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप तरी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवरून भाजपा नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, ही चौकशी संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आणि चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपाच्या आंदोलनावर टिप्पणी केली आहे. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते अशाप्रकारे वागत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. “मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं. जी काही न्याय प्रक्रिया असते ती आम्ही पुढे नेत असतो, मी त्यावर कुठलही बाकीचं वक्तव्य करणार नाही. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते अशाप्रकारे वागत आहेत.” असं माध्यमांशी बोलाताना आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button