पाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त स्केच ड्रॉईंग स्पर्धा

शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्याचा प्रयत्न

आळंदी (देवाची), पुणे । The Creative Skillful Hands Club तर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्केच ड्रॉईंग स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा     :  MIT Arts, Commerce and Science College मध्ये ‘कोड अँड क्रिएट’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “शिवजयंती” या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व कल्पक रेखाचित्रे सादर केली. रेखाचित्रांतील सर्जनशीलता, विषयाची प्रभावी मांडणी, रेषांची अचूकता आणि एकूण कलात्मकता या निकषांवर परीक्षकांनी मूल्यमापन केले. परीक्षक म्हणून प्रा. जयंवंत भुमकर व प्रा. निकिता देवरे यांनी काम पाहिले.

 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला – प्रथम क्रमांक – सार्थक आंबोरे, द्वितीय क्रमांक – प्रज्ञा साळवे, तृतीय क्रमांक – अक्षता कोळी. विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव…

या उपक्रमासाठी क्लब समन्वयक निशिगंधा भालेकर तसेच कार्यक्रमाचे आयोजन रेणुका कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी कल्याण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्य डॉ. अक्षता कुलकर्णी तसेच डॉ. मानसी आतीतकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button