पिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथे डांबरीकरणाच्या कामास ‘‘गती’’

स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा : भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर येथे लोंढे कॉर्नर येथील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आली असून परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने तसेच पावसाळ्यात चिखल साचल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई काटे तसेच नगरसेविका कुंदाताई भिसे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांच्या डांबरीकरणास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. अपघातांची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

हेही वाचा –   अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन । महाराष्ट्र व्यसनाधीनतेचा ‘‘उडता पंजाब’’

सध्या सुरू झालेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे रस्ते मजबूत व गुळगुळीत होणार असून वाहतुकीस अधिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डे आणि चिखलाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात उपाय होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्थानिक रहिवाशांनी कामास सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. परिसराच्या विकासासाठी अशाच प्रकारे पुढाकार घेऊन इतर प्रलंबित कामेही मार्गी लावावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

“माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात मिळाल्याच पाहिजेत, यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता किंवा इतर कोणतीही समस्या असो — प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून ती मार्गी लावणे ही माझी जबाबदारी आहे. नागरिकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद असून, विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button