फ्युजन क्लबतर्फे “एक दिवसीय सिनेमॅटोग्राफी कार्यशाळा व स्पर्धा” यशस्वीरित्या संपन्न

आळंदी : एमआयटी आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालय, आळंदी येथे दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी फ्युजन क्लबतर्फे “एक दिवसीय सिनेमॅटोग्राफी कार्यशाळा व स्पर्धा” उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकूण ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉ. सुनील महाजन, फ्युजन क्लब समन्वयक प्रा. निकिता देवरे, तसेच क्लब सदस्य सिद्धी वाघचौडे, प्रा. प्रविण कार्ले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या व्हिडिओग्राफी कौशल्यांचा विकास, सादरीकरण कौशल्य वृद्धी आणि तांत्रिक ज्ञानात भर घालणे हा होता. संसाधन व्यक्ती शुभम पोंपळे यांनी कॅमेरा अँगल्स, फ्रेमिंग, लाईटिंग, स्टोरीबोर्डिंग आणि एडिटिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे शिकलेल्या संकल्पनांचा सराव केला.
कार्यशाळेनंतर सिनेमॅटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण श्री. शुभम पोंपळे (CEO, Sharp Multimedia) यांनी केले. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि सादरीकरण यांचा उत्कृष्ट संगम सादर केला.
स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात आली:
* प्रथम क्रमांक – ₹1,000/-
* द्वितीय क्रमांक – ₹7,00/-
* तृतीय क्रमांक – ₹500/-
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. बी. बी. वाफारे, शिक्षकवृंद व फ्युजन क्लब सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख झाली व त्यांच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळाले.




