ताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

MIT Arts, Commerce and Science College मध्ये ‘कोड अँड क्रिएट’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत करण्याचे उद्दीष्ट

आळंदी, पुणे | MIT Arts, Commerce and Science College येथील स्टुडन्ट अफेअर्स अंतर्गत कार्यरत अफ्लाटस क्लबच्या वतीने “कोड अँड क्रिएट” या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध शैक्षणिक शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली तांत्रिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीचे प्रभावी प्रदर्शन केले.

स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कोडिंग कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशील विकासाला चालना देणे हा होता. सहभागी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाययोजना आणि कल्पक प्रकल्प सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून भक्कम तांत्रिक ज्ञानाबरोबरच उत्कृष्ट टीमवर्कची झलक पाहायला मिळाली.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व सिटीयस्टेकचे तांत्रिक प्रमुख श्री. सूरज राजू काकडे तसेच कॅपजेमिनीचे सल्लागार श्री. शानवाज मन्सुरी उपस्थित होते. त्यांनी नवोपक्रम, तांत्रिक अचूकता, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्यांच्या आधारे स्पर्धकांचे मूल्यमापन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त उद्योग अनुभव आणि मार्गदर्शनही दिले.

हेही वाचा     :            युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब 

कार्यक्रम संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी व डॉ. मानसी अतितकर, डॉ. सुनील महाजन (डीन, स्टुडन्ट अफेअर्स) तसेच प्रा. रश्मी लाड (डीन, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड अॅप्लिकेशन) यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. मान्यवरांनी या स्पर्धेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

अफ्लाटस क्लबच्या समन्वयक सहाय्यक प्रा. कविता शिंदे यांनी त्यांच्या टीम सदस्य श्रीमती अनुपमा अलगणवार, डॉ. कविता महाजन, श्री. ऋषिकेश चिकणे आणि श्रीमती शितल शेवकरी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. बक्षीस वितरण व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘कोड अँड क्रिएट’ ही स्पर्धा महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सह-अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये आणखी एक यशस्वी टप्पा ठरली.

“आजच्या स्पर्धांमधील अनुभव विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक ज्ञान नव्हे तर नवोपक्रमशील विचारसरणी आणि टीमवर्कसारख्या महत्वाच्या गुणांची जाणीव करून देतो. अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे त्यांच्यासाठी भविष्यातील करिअरसाठी एक ठोस पाया निर्माण करतो.”

– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button