ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

Crescendo नाट्यस्पर्धेत MIT महाविद्यालयाचा दणदणीत विजय

‘फ्लॅट नं. ५०४’ नाटकाला सांघिक प्रथम; लेखन व दिग्दर्शनातही अव्वल यश

पुणे | विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘Crescendo’ या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत MIT कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘फ्लॅट नं. ५०४’ हे नाटक सादर करत उत्कृष्ट अभिनय, लेखन आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत महाविद्यालयाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला.

हेही वाचा      :              विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची ‘भ्रूणहत्या’ केली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

तसेच, नाटकाचे लेखक संपत शेट्टी यांना प्रथम क्रमांक, तर दिग्दर्शक अथर्व कांबळे यांनाही प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. बी. बी. वाफारे, डीन स्टुडंट्स अफेअर्स डॉ. सुनील महाजन तसेच सांस्कृतिक समन्वयक निशिगंधा भालेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button