ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल..!

शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव..

भोसरी | प्रतिनिधी

भोसरी येथील संत साई माध्यमिक विद्यालय शाळेने दहावीच्या परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या २५ व्या तुकडीने (Batch) दहावीच्या परीक्षेत १०७ पैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण होत शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या यशामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का पालवे – ९६.६०%, विनया वैष्णवी – ९६.४०%, समृद्धी पराड – ९४.६०% या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी बाहेरील कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय केवळ स्वाध्याय आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत हे यश मिळविले, ही बाब इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यांची भक्कम साथ लाभल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

हेही वाचा

यूकेतील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटी यांच्यात शैक्षणिक सहकार्याला नवे बळ

या यशामुळे पालक, शिक्षक व या संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाळेचे संस्थापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मुख्याध्यापिका सौ. सुनिता शिवलिंग ढवळेश्वर मॅडम तसेच शाळेच्या विश्वस्त पायल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षकवृंद व पालकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

अथक परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. संत साई माध्यमिक विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button