ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

यूकेतील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटी यांच्यात शैक्षणिक सहकार्याला नवे बळ

दोन्ही संस्थांच्या सामंजस्य करारानंतर महत्वपूर्ण बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी 

जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसाठी नव्या संधी निर्माण करत उच्च शिक्षणाला परिवर्तनशील दिशा द्यावी, असे प्रतिपादन यूकेमधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ येथील आंतरराष्ट्रीय विभागाचे सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी केले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि ॲबरिस्टविथ विद्यापीठ यांच्यात निर्माण होत असलेले दृढ शैक्षणिक नाते भविष्यात दोन्ही संस्थांच्या विस्तारासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पीसीईटी आणि यूकेमधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ यांच्यात २०२५ मध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. या कराराच्या पुढील टप्प्यांतर्गत पीसीईटी ट्रस्टच्या कार्यालयात दोन्ही संस्थांच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.

हेही वाचा

अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ॲबरिस्टविथ विद्यापीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय विभागाचे सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट, प्रादेशिक व्यवस्थापक सामंथा वॅलिन, सल्लागार झफीर आलम यांनी सहभाग घेतला. पीसीईटीकडून ओ.एस.डी. डॉ. योगेश भावसार, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. निरुपमा कोचेरलाकोटा तसेच डिजिटल मार्केटिंग विभागाच्या शुभांगी रामटेके या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याच्या विविध शक्यता सविस्तरपणे चर्चिला आल्या. उच्च शिक्षण, संशोधन, शेती, कला, संस्कृती, विद्यार्थी व प्राध्यापक विनिमय या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि भक्कम भागीदारी उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यामुळे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे.

ॲबरिस्टविथ विद्यापीठ हे शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनातील भक्कम कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्च शिक्षण व संशोधन सुविधांसाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संयुक्त शैक्षणिक संशोधन, परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, अल्पकालीन अभ्यासक्रम, समर स्कूल उपक्रम, विद्यार्थी-प्राध्यापक विनिमय, क्रेडिट ट्रान्सफर तसेच विद्यार्थी इंटर्नशिप यांसारखे विविध सहयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.

– डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पीसीईटी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button