Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

अक्षर पटेलला मोठा फटका; पंजाबला हरवल्यानंतर बीसीसीआयकडून दंडात्मक कारवाई

Axar Patel | आयपीएल २०२६ मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर २ गडी राखून विजय मिळवत आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच कर्णधार अक्षर पटेलला बीसीसीआयने १२ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) ही कारवाई करण्यात आली आहे.

धरमशाला येथील खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत पाहून अक्षर पटेलने या सामन्यात अनोखी रणनीती आखली होती. त्याने स्वतः गोलंदाजी न करता पाच वेगवान गोलंदाजांकडून संपूर्ण २० षटके टाकून घेतली. या रणनीतीमुळे पंजाबचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, मात्र वेगवान गोलंदाजांच्या वापरामुळे २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने सामनाधिकाऱ्यांनी अक्षरला १२ लाखांचा दंड सुनावला.

हेही वाचा

पिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय; महापौर रवि लांडगे

अक्षरचे झुंजार अर्धशतक आणि आक्रमक फलंदाजी

२११ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. अशा कठीण परिस्थितीत कर्णधार अक्षर पटेलने जबाबदारी स्वीकारत ३० चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अक्षरने डेव्हिड मिलरसोबत भक्कम भागीदारी करून विजयाचा पाया रचला. अक्षर बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी आक्रमक फटकेबाजी करत २११ धावांचे लक्ष्य १९ व्या षटकातच पूर्ण केले.

दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दिल्लीला आता त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. जर त्यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १४ गुण होतील. अशा परिस्थितीत, इतर संघांचेही १४ गुण असल्यास आणि दिल्लीचा नेट रन रेट सरस ठरल्यास, अक्षर पटेलचा संघ बाद फेरीत प्रवेश करू शकतो. सलग पराभवांमुळे बॅकफूटवर गेलेल्या दिल्लीसाठी हा विजय ‘संजीवनी’ ठरला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button