पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

बालेवाडी : बालेवाडी स्टेडियम येथे पिंपरी (२०६) व भोसरी (२०७) या विधानसभा मतदार संघाच्या मतदानमोजणी केंद्रास व स्ट्रॉंग रूमला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भेट देऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली व आवश्यक त्या सुचना केल्या.
यावेळी पोलीस उप आयुक्त वाहतुक बापू बांगर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३ डॉ. शिवाजी पवार, सहा पोलीस, गुन्हे १ डॉ.विशाल हिरे, बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते हे उपस्थित होते.
हेही वाचा – ‘अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करून घेतला’; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुक बुधवार (दि.२०) रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी शनिवार (दि.२३) रोजी होणार आहे. २०६ पिंपरी विधानसभा आणि २०७ भोसरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. तर मतदानानंतर मतदान यंत्रे ठेवण्याकरीता निर्माण करण्यात आली स्ट्रॉंग रूम देखील याच ठिकाणी आहे. या ठिकाणची पाहणी आज पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केली तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.





