Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खासदार ओमराजे निंबाळकर यांची अधिकृत घोषणा; उद्धव ठाकरेंना धक्का

Omraje Nimbalkar : राज्याच्या राजकारणातील चर्चांना अखेर पूर्णविराम देत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले, “आज मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. दुपारपासून रात्रीपर्यंत सर्वांशी सविस्तर चर्चा केली. प्रत्येकाचे मत जाणून घेतले. सर्वांच्या सूचनांचा विचार करून हा निर्णय घेतला.”

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर”

निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. “आमचा कार्यकर्ता कामात कधी कमी पडला नाही. सामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मात्र सत्तेअभावी अनेक विकासकामांमध्ये अडचणी आल्या. अगदी सामान्य नागरिकांच्या ट्रान्सफॉर्मरसारख्या छोट्या कामांसाठीही अडथळे निर्माण होत होते.”

ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दांत घोषणा केली, “सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार आम्ही आता शिवसेना पक्षात जाणार आहोत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.” या घोषणेनंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button