Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण

मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

राज्यातील १० जिल्ह्यांतील ७ नगर परिषद व ७ नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी ७२.१२ टक्के, तर पोटनिवडणुकांसाठी ७१.५५ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकीकरिता एकूण ४० हजार ८६९ मतदार होते. त्यापैकी २० हजार ३५४ पुरूष मतदार तर २० हजार ५१५ स्त्री मतदार होते. या सार्वत्रिक निवडणुकीत ११ हजार ८२१ पुरूष मतदारांनी आणि १० हजार ८५३ स्त्री मतदारांनी मतदान केले तर पोट निवडणुकीसाठी ३,३२४ पुरूष आणि ३,४१९ स्‍त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा –  खासदार ओमराजे निंबाळकर यांची अधिकृत घोषणा; उद्धव ठाकरेंना धक्का

या निवडणुकांसाठी राज्यभरात ५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी ५१ ईव्हीएम यंत्रे तसेच तेवढ्याच संख्येने बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याचा अहवाल प्राप्त झाला नसून सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडली.

त्याचप्रमाणे, आज दिनांक २१ जून २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केले आहे.

या नगरपंचायत / नगरपरिषदेच्या सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकीत मतदान तसेच मतमोजणी दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्व ठिकाणी शांततेत मतदान व मतमोजणी पूर्ण झाली, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button