Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिंपरी ​चिंचवड (प्रतिनिधी):

येथील मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या श्रीमती सुनीता भिडे आणि संस्थेच्या कार्यवाह, तहहयात विश्वस्त व प्राचार्या मा. सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांच्या हस्ते ‘ॐ’ प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.

 योग हा जीवनाचा अविभाज्य भाग: श्रीमती सुनीता भिडे

​प्रास्ताविक भाषण करताना प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची पार्श्वभूमी सांगून दैनंदिन जीवनात योगाचे असलेले स्थान स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या श्रीमती सुनीता भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,
​”निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे. यम, नियम, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांमुळे मानवी आयुष्य अधिक सुदृढ आणि सकारात्मक बनते.”

हेही वाचा –  ‘योगाची शक्ती संपूर्ण जगाला जोडतीय’ ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बंगालच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा संदेश

​विद्यार्थी व शिक्षकांचे योगासन प्रात्यक्षिक

​मार्गदर्शनानंतर शाळेच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १२ सूर्यनमस्कार घातले. यासोबतच शारीरिक संतुलन आणि एकाग्रता वाढवणारी वृक्षासन, ताडासन, पद्मासन यांसारखी विविध आसने व प्राणायाम उत्साहाने केले.

या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. नवनीत झेंडे

यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन सौ. मेधा उजळंबकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. वैशाली येळे यांनी मानले. सर्व उपस्थितांनी दररोज योग करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button