झाडं ही आमच्यासाठी तुळस, एक लाख झाडांची खिळेमुक्ती : माधव पाटील
अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्त झाडं अभियानाचा पाठपुरावा

पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या ट्री ॲम्बुलन्सचे उद्घाटन
पुणे | गेल्या सात वर्षात अंघोळीची गोळी संस्थेने इतर संस्थांच्या मदतीने हजारो झाडांचे लाखो खिळे काढले. तसेच संस्था झाडांना अळी करण्यासाठी ही पुढाकार घेत होती.
सातत्यपूर्व प्रयत्नांमुळेच आणि पाठपुराव्यामुळेच महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्बुलन्स सत्यात उतरली. त्या ट्री ॲम्बुलन्सचे उद्घाटन पाच जूनला, जागतिक पर्यावरण दिवशी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील आणि त्यांच्या टीमला विशेष आमंत्रित केले होते. उद्घाटन झाल्यानंतर माधव पाटील यांनी खिळेमुक्तझाडं या अभियानाविषयी सर्वांना माहिती दिली.
हेही वाचा : बनावट देशी दारू साठ्यावर कारवाई; ५१.३२ लाखाचा मुद्देमाल जप्त
या ट्री ॲम्बुलन्स च्या साह्याने झाडांचे खळे काढणे, झाडांना आळी करणे, वाळवी लागलेल्या झाडांना औषध पाणी करणे तसेच झाडांवर उंचावर लटकवलेले बोर्ड आणि बॅनर काढणे यासाठी होणार आहे. यावेळी संस्थेचे माधव पाटील, आयुता रांगोळे, संदीप रांगोळे आदी उपस्थित होते. जशी माणसांची मलमपट्टी होते तशी आता झाडांचीही मलमपट्टी होणार. पाच जून हा दिवस झाडांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असे मत माधव पाटील यांनी व्यक्त केले.