मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घरबसल्या ‘असे’ झटपट चेक करा..

Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होत असून तुम्हाला मतदान करायला जाण्यापूर्वी तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे घरबसल्या चेक करता येणार आहे. मतदान केंद्रावर पोहचण्याआधीच तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे कसे चेक करायचं ते आपण समजून घेऊ.
सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.eci.gov.in वर लॉग इन करावे लागेल. जसे तुम्ही ही वेबसाईट उघडल्यानंतर होम पेजवर Search Your Name in Voter List हा पर्याय दिसू लागेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
हेही वाचा – ‘अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करून घेतला’; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप
त्यानंतर राज्याची निवड केल्यानंतर तेथे आपला EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा. त्यानंतर कॅप्चा भरल्यानंतर तुमचे नाव जर मतदार यादीत दिसेल त्यावर तूमची संपूर्ण माहिती देखील दिसेल. ज्यात तुमच्या पोलिंग बूथची आणि अन्य माहिती दिलेली असेल.
तसेच जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मतदार यादीत नोंदविला असेल तर मोबाईल नंबर नोंदवून देखील तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत चेक करु शकता. तसेच तुम्ही १९५० नंबर वर कॉल करुन देखील मतदारयादीत आपले नाव आहे की नाही ? ही माहिती मिळवू शकता. ही सेवा मोफत आहे. या टोल फ्री नंबर वरुन तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची पडताळणी करु शकता.





