Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेची अंमलबजावणी

परिसरातील विद्यार्थी, नागरिक ज्येष्ठ नागरिक, वाहनचालकांना दिलासा

पिंपरी- चिंचवड :  निगडीतील त्रिवेणीनगर, दुर्गानगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जड वाहतूक, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, तसेच या भागातील शाळांची मोठी संख्या त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन या महत्त्वाच्या चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’ बसविण्यात येणार आहेत.

याबाबत महापालिका स्थापत्य विभाग, निगडी वाहतूक विभागाला भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी सूचना केली होती. त्यानुसार सदर कार्यवाही करण्यात आली.

निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये असणाऱ्या दुर्गानगर चौकातून यमुनानगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याला जड वाहनास बंदी आहे. तरी सुद्धा अनेकदा या रस्त्यावर भरधावपणे जड वाहने वाहतूक करतात. यापूर्वीच या भागातील जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. वाहतूक विभागाने त्याप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला होता मात्र या भागातून जडवाहनांना संपूर्णपणे अटकाव होऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे. या भागामध्ये शाळांची संख्या सर्वाधिक आहे. नागरिक, पालकवर्ग, शाळेतील वि‌द्यार्थी वर्ग, शाळेतील शिक्षिक वर्ग व कामगार वर्ग यांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.

हेही वाचा –  डीपीयू आणि टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात शैक्षणिक सामांजस्य करार

अपघाताच्या काही घटना यापूर्वी देखील झालेल्या होत्या. अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी या सर्व्हिस रस्त्यावरील जड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी उंचीचे बॅरिगेट्स लावण्याची गरज होती. त्याप्रमाणे महापालिका स्थापत्य विभाग आणि निगडी वाहतूक विभागाला सूचना करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्रिवेणीनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन्ही बाजूला उंचीचे बेरीगेट्स बसविण्यात येत आहे, अशी माहिती माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

वाढत्या महानगरांसमोर वाहतूक नियंत्रण, वाहतूक कोंडी या मोठ्या समस्या आणि आव्हान आहे. या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची मागणी, प्रभागाच्या लोकप्रतिनिधींची सूचना वेळोवेळी लक्षात घेतली जाते. त्याप्रमाणे निगडी लगतच्या त्रिवेणीनगर, दुर्गानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उंचीचे बॅरियर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button