डीपीयू आणि टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात शैक्षणिक सामांजस्य करार

पिंपरी : टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू) पिंपरी तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टि्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आकुर्डी यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी टेक्सास स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रणेश अस्वथ,फाईन आर्टस् अँड कम्युनिकेशन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जॉन फ्लेमिंग, मॅककॉय कॉलेज ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता डॉ संजय रामचंद्र, मॅककॉय कॉलेज ऑफ बिझनेसचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ शेठ फ्रे,विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बॅरेट ब्रायंट, डीपीयूचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र कुलगुरू स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. जितेंद्र भवाळकर, डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोहन चितलांगे, देविका शेट्टी, डॉ. डी .वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत चव्हाण पाटील, विश्वस्त डॉ. जे. जी. पाटील, संचालक ललित प्रसाद, प्रा. अविनाश पवार, आनंद खांडेकर, लिब्रल आर्ट कॉलेजचे संचालक डॉ. नंदकिशोर कपोते आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘धार्मिक द्वेषाचा मुद्दा उपस्थित करत पक्ष मान्यता रद्द करण्याची मागणी’; संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल
यावेळी टेक्सास युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अस्वथ आणि डीपीयूचे कुलगुरू डॉ. पवार या दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करार अंतर्गत डीपीयूच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योजकता, डिझाईन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयावर इंटर्नशिप करता येणार आहे.
तर डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या सोबत केलेल्या करार अंतर्गत दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिप आणि संयुक्त पदवी कार्यक्रम राबवता येणार आहे.