सूर्यकुमार यादवला डच्चू मिळणार! ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा पुढील कर्णधार

Team India T20 Captain: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच इतिहास घडवला आहे. भारतात झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण आता त्याचं कर्णधारपद जाऊ शकतं. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, निवडकर्ते त्याला कर्णधारपदावरून काढू शकतात. त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे टी -२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आयपीएल २०२६ स्पर्धेनंतर जेव्हा निवडकर्त्यांची बैठक होईल, तेव्हा सूर्यकुमार यादवबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. टी -२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली जाऊ शकते.
हेही वाचा – एम. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा उज्वल निकालाची परंपरा कायम
माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवची लागोपाठ फ्लॉप कामगिरी पाहता निवडकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे. येत्या काही दिवसात नवीन टी -२० सायकल सुरु होणार आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना आता बदल हवे आहेत. भारतीय संघ नव्या टी -२० सायकलची सुरुवात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली जाऊ शकते. भारतीय संघ सध्या २०२८ टी -२० वर्ल्डकप आणि ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी करण्याच्या प्रयत्नात आहे.
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या आहेत. पण फलंदाज म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही तो धावा करू शकला नव्हता. आता आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्याची बॅट शांत राहिली आहे. त्याचं कर्णधारपद जाणार हे तर निश्चित आहे. सूर्याने आणखी २ वर्ष कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याला फलंदाज म्हणून तरी संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आता त्याला संघात स्थान दिलं जाऊ शकतं, तो कर्णधार म्हणून संघात एंट्री करू शकतो. यामागचं कारण त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर गेल्या हंगामात पंजाबला अंतिम फेरीत पोहोचवलं. या हंगामातही पंजाबचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. यासह त्याने फलंदाजीतही योगदान दिलं आहे.





