Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची मध्यरात्री उपोषणाला सुरूवात

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मध्यरात्रीपासून अंतरवला सराटी येथेउपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारला आता शेवटची संधी आहे. सरकार आम्हाला जाणूनबुजून आरक्षण देत नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता सुरूवात झाली आहे.

मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गॅझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे, अशीस मागणी केली होती.

हेही वाचा –  ‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देणार’; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडे आहेत त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, असं म्हणत जरागेंनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button