Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

हिंदू कलाकारांचे चित्रपट बघा, कशाला हवेत खान? मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

नाशिक | राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे आपल्या आक्रमक विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नाशिकमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना नितेश राणेंनी शाहरूख खान, आमिर खान यांचे चित्रपट पाहू नका, असं थेट आवाहन उपस्थितांना केलं. तसेच, असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला त्यांनी दहशतवादी संघटना म्हणत त्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी भरल्याचाही गंभीर आरोप केला.

नितेश राणे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना बॉलीवूडमधील खान कलाकारांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आज खान लोकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. कारण आमचा धुरंदर आणि छावा त्यांना भारी पडतोय. ही ताकद हिंदू समाजाची आहे. आपणही निर्धार करायला हवा की आपण चित्रपट बघणार तर हिंदू कलाकारांचेच आणि इतर लोकांना घरी बसवणार. यांच्यामुळेच ही लव्ह जिहादसारखी प्रकरणं घडतात. रणवीर सिंग, हृतिक रोशन यांचे चित्रपट आहेत ना बघण्यासारखे. त्या कलाकारांचे चित्रपट बघा. कशाला पाहिजेत ती शाहरूख खान, आमिर खानची नाटकं? त्यांची घरं भरण्यासाठी? असं मंत्री नितेश राणे यावेळी भाषणात म्हणाले.

हेही वाचा      :                ‘निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लव्ह जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू बहिणी जिहाद्यांच्या संपर्कात येतात. शाहरूख खाननं चार बटणं उघडली की आपले शोधायला लागतात शाहरूख खान. आमिर खाननं तिकडे काहीतरी केलं, की इकडे हेही तसं करायला लागतात. लव्ह जिहादला हे सगळे खान लोकांचे चित्रपट कारणीभूत आहेत. हिंदूंना कसं कमी दाखवायचं, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हाच कार्यक्रम या खान लोकांनी केलाय, असं नितेश राणे म्हणाले.

माझं स्पष्ट मत आहे की एमआयएम हा राजकीय पक्ष नसून दहशतवादी संघटना आहे. त्यामुळेच ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत. जशी आयएसआय, पीएफआय, अलकायदासारखी एमआयएम संघटना आहे. कचऱ्यासारखे सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या त्या पक्षात भरून ठेवलेत, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button