Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुल गांधी यांच्याबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवलं; संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आता त्यांना भोवलं आहे. संजय गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार 192, 351 (२) , ३५२ (३), ३५२ ( ४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

“आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा    –    पद्मश्री ना. धों. महानोर यांनी शेतकरी जीवन मांडले; काशिनाथ नखाते 

जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल असे संजय गायकवाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button