शेअर बाजारात जोरदार तेजी; निफ्टी ५ महिन्यांच्या उच्चांकावर
मुंबई – ऑगस्टमध्ये मुंबई शेअर बाजारात तेजीचे वातावरण परतले आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच निफ्टीने ११,५००चा टप्पा ओलांडला. २४ मार्चला निफ्टीने निचांक केला होता. त्यानंतर निफ्टीने आतापर्यंत ५३ टक्क्यांची शानदार तेजी नोंदवली आहे. १६ ऑगस्टपासून सलग अकराव्या दिवशी निफ्टीत तेजी आहे. आज सकाळी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७३ अंकांची तर निफ्टीत १८ अंकांची वाढ झाली होती.
जागतिक बाजारातून आलेल्या चांगल्या संकेतामुळे आज सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४५ अंकांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला. त्यामुळे तेजी कायम राखण्यात बाजाराला यश आले नाही. इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, आयशर मोटर, एसबीआय आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांमध्ये वाढ झाली होती. भारती इन्फ्राटेल, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि यूपीएल या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती





