breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा जागावाटप ‘फॉर्म्यूला’ : मावळातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच ‘महायुती’चे उमेदवार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच : ‘महायुती’मध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या जागा ‘सेफ’

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपावरुन कुरघोडी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक घाव दोन तुकडे’ अशी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागा ‘महायुती’ जिंकेल, त्यासाठी शिंदे गटासोबत आलेले सर्व खासदार यांना त्या-त्या मतदार संघात संधी दिली जाईल, असे सूतोवाच फडणवीस यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जागावाटपाबाबत भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येत नाही. अन्यथा आम्ही कोणत्याही क्षण निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असा दावा फडणवीस यांनी केला. 

तसेच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागांवर महायुतीचे वर्चस्व राहील. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा सुपडासाप करु, असा विश्वास फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपा-शिवसेना महायुती सरस राहील, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पुणे, शिरूर भाजपा, मावळात शिवसेना…  

पुणे आणि पिंपरी-चिंचवडशी संबंधित आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तिकीटवाटपाचे चित्र स्पट झाले असून, मावळातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार राहणार आहे. तर शेजारील शिरूर लोकसभा मतदार संघातूनही भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुणे आणि शिरुर मतदार संघात भाजपाने ‘लोकसभा प्रचार दौरा’ गेल्या दीड वर्षांपासून प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे. भारतीय जनता पार्टीने मावळ लोकसभा मतदार संघ प्रमुखपदी प्रशांत ठाकूर यांनी नियुक्ती केली आहे. त्याद्वारे मावळात घाटाखालील मतांची गोळाबेरीज यशस्वी होणार असून, त्याचा फायदा बारणे यांना होणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि शिरु लोकसभा मतदार संघात आमदार महेश लांडगे यांच्यावर निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button