breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार १८ जानेवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल.

अशुद्ध जलउपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरूस्तीची कामे करणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यासाठी रावेत नदी जलउपसा केंद्र येथील गुरूवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रावेत येथील जलउपसा केंद्र बंद राहणार आहे.

हेही वाचा   –   मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारवर खळबळजनक आरोप; म्हणाले.. 

महापालिकेमार्फत होणारा गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १९ जानेवारी रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित, कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसासाठा करून काटकसरीने वापर करुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button